


कोकण विकास परिषद
Kokan Development Counil
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ
विविध कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी )
-
प्रकल्प मर्यादा रु . ३ लाख पर्यंत
-
व्याजदर (वार्षिक) ५०,०००/- पर्यंत ५%
५०,०००/- वरील ६%(स्त्री लाभार्थींना १% सूट अनुज्ञेय आहे. )
-
मंजुरीचे अधिकार - व्यवस्थापकीय संचालक , मुंबई .
दीर्घ मुदती कर्ज योजना
-
प्रकल्प मर्यादा खरेदी / विक्री व्यवसाय रु .३ लक्ष पर्यंत
-
सेवा व्यवसाय ५ लाखा पर्यंत लाभार्तींचा सहभाग - ५%
-
राज्य महामंडळाचा सहभाग - ५% परतफेडीचा कालावधी - १० वर्षे .
-
वार्षिक व्याज - पुरुषांसाठी ६ % मंजुरीचे अधिकार NHFDC
-
-
वाहतूक व्यवसायासाठी वाहन कर्ज योजना
-
प्रकल्प मर्यादा रु . १० लाख पर्यंत
-
लाभार्थींचा सहभाग - ५%
-
वार्षिक व्याजदर - पुरुष ६%,महिला - ५%, रु . ५ लाखापर्यंत व त्यापेक्षा जास्त ७%
-
राज्य महामंडळ - ५%
-
परतफेडीचा कालावधी - १० वर्षे
-
मंजुरी अधिकार NHFDC
-
मुख्य अट - अर्जदाराच्या पहिल्या नातेवाईकाच्या नावे कायमस्वरूपी वाहन परवाना आवश्यक . ट्रेक्टरसाठी लाभार्थींच्या नवे किमान ८ एकर जमीन असावी .
-
महिला समऋद्धी योजना
-
अपंग महिलांना उप्रोल्लोखित राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांमध्ये महिला समृद्धी योजनेंतर्गत १% सूट व्याजदरांमध्ये दिली जाते .
-
रु . ५०,००० /- पर्यंत ४% दराने , रु . ५०,००० ते ५ लाख पर्यंत ५% दराने तर
-
कर्जमंजुरी प्रक्रियेत महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाते
-
इतर अति व शर्थी सर्वसामान्यांप्रमाणे लागू .
-
-
सूक्ष्म-पतपुरवठा योजना
-
नोंदणीकृत अशासकीय संस्थानमार्फत स्वयंसहाय्यता बचत गटास कर्जपुरवठा करणेसाठी संस्थेला रु . ५ लाखपर्यंत कर्ज नोंदणीकृत संस्थेला सभासदांसाठी थेट कर्ज
-
संस्था बचत गटातील कमीत कमी २० सदस्यांना जास्तीत जास्त रु . २५,००० /- पर्यंत कर्ज देऊ शकते . तथापि , जास्तीत जास्त सभासदांना कर्ज वितरीत करणे अपेक्षित आहे.
-
लाभार्थींना ५% दराने व्याज आकारले जाते .
-
परतफेडीचा कालावधी ३ वर्षे
-
शैक्षणिक कर्ज योजना
-
आरोग्य विज्ञान , अभियांत्रिकी , डी . एड . व बी . एड .व्यवस्थापन व संगणक अथवा तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रम करिता परिषदांची मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थांमार्फत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी .
-
संपूर्ण अभ्यास्क्रमासाठी रु . १० लाखापर्यंत (देशांतर्गत) व रु . २० लाक्ष्पर्यंत (परदेशात)
-
कर्जावर ५०,००० /- पर्यंत ५% ५०,००० ते ५ लक्ष -६% , त्यापेक्षा जास्त ७%, महिलांना १% सूट शिक्षण पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर ७ वर्षात परतफेड .
-
-
राज्य शासनाची वैयक्तिक थेट कर्ज योजना
-
उद्देश मुख्यत्वे कमी , भांडवलात व्यवसाय सुरु करणे .
-
कर्जाची कमाल मर्यादा रुपये २० हजार
-
व्याजाचा दरसाल दर शेकडा २%
-
परतफेडीचा कालावधी मासिक / तैमासिक ३ वर्षे
-
उत्पन्नाची मर्यादा १ लाखापर्यंत
-
वय मर्यादा १८ ते ५५ वर्षे इतर अर्हता या माहितीपत्रकात इतर योजनांसाठी उल्लेखल्याप्रमाणे .
अर्जदार लाभार्थींची अर्हता:
-
लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा .
-
महाराष्ट्राचा रहिवास १५ वर्षपासून असावा .
-
त्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे .
-
तो कोणत्याही बँकेचा , महामंडळाचा किंवा वित्तीय संस्तेचा थकबाकीदार नसावा .
-
ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु . ३ लाख रुपयापेक्षा कमी असावे , तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु .५ लाख रुपयापेक्षा कमी असावे .
-
अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल , त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किवा अनुभव असावा .
-
कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील .
मानसिक विकलांग (मनोरुग्ण), सेरेब्रल पाल्सी आणि आत्ममग्न (ऑटीझम)
अशा अपंगांसाठी स्वयंरोजगार योजना
-
कर्ज मर्यादा - रुपये १० लाख
-
कर्ज देताना त्यासठी कराव लागणारा कायदेशीर करार हा मनोरुग्ण व्यक्तीबरोबर करता येत नसल्यामुळे त्यांना खालील व्यक्ती मार्फत कर्ज मिळवता येईल .
-
. मनोरुग्णाचे आई - वडील
-
. मनोरुग्णाचे सहचार (पत्नी किंवा पती )
-
. कायदेशीर पालक
-
-
मतीमंद व्यक्तीच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य योजना
-
प्रकल्प मर्यादा कमल रु . ५ लक्ष पर्यंत
-
पालक संस्थेची नोंदणी निदान ३ वर्षे आवश्यक
-
कर्ज परतफेडीचा कालावधी : १० वर्षे
-
सुरक्षा - एकूण मंजूर रकमेचा २५ % रक्कम , NHFDC च्या नावे मुदत ठेव स्वरुपात तारण तारम किंवा ४०% रक्कम साम्पास्छिक , (collateral security ) सुरक्षा
-
अशासकीय संस्तेचा सहभाग - प्रकल्प किमतीच्या ५%
-
संस्थेमध्ये कमीत कमी दर : रु . ५० हजारापर्यंत ५%, रु. ५० हजाराच्या वर ते रुपये ५ लाखापर्यंत ६%
अपंग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी / होर्टी कल्चर योजना
-
प्रकल्प मर्यादा रु. १० लक्ष पर्यंत
-
लाभार्थींचा सहभाग - ५%
-
राज्य महामंडळ - ५%
-
परतफेडीचा कालावधी - १० वर्षे
-
मंजुरी अधिकार NHFDC
-
वार्षिक व्याजदर - पुरुष ६%, महिला ५% रु . ५ लाखापर्यंत व त्यापेक्षा जास्त ७%
-
कर्जमागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
-
मुळग विहित नमुन्यांतील अर्ज पुर्णत: भरलेला
-
१५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव केल्या बाबतचा दाखला / डोमेसाईल सर्टर्फिकेट()
-
वयाचा दाखला , शाळा सोडल्याचा दाखला ( वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे )
-
अपंगत्वाचा दाखला (ग्रामीण भागासाठी तलाठी / शहरी भागासाठी तहसीलदार)
-
अनुभवाबाबत प्रमाणपत्र
-
निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत
-
पासपोर्ट साईझ व पूर्ण आकाराचे फोटो (अर्जावर चिटकाविण्यात यावेत)
-
जातीचे प्रमाणपत्र
-
जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वताच्या मालकीची /भाड्याची /भाडे पावती , विशिष्ट मुदतीचे भाडे कार्रार्पत्रक इ.)
-
मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना -
-
५०% अनुदान योजना
-
प्रकल्प मर्यादा रु . ५०,००० /- पर्यंत .
-
प्रकल्प मर्यादेच्या ५०% किंवा जास्तीत जास्त रु . १०,०००/- पर्यंत अनुदान देण्यात येते व राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते . बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते . कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे ३ वर्षात करावयाची आहे .
-
प्रशिक्षण योजना
-
जातीच्या लाभधारकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित तांत्रिक व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध व्यावसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थेमार्फत (६ महिन्यांपर्यंत ) मोफत प्रशिक्षण देण्यात येते . उदा .टी.व्ही. रीपेयरिंग , फ़ेब्रिकेशन / वेल्डिंग , इलेक्ट्रिशन, वाहन दुरुस्ती , मोटार मेकानिक , वाहन चालक , शिवणकला , संगणक , ब्युटी पार्लर , होम अप्लायन्स , मोबाईल रीपेयरिंग , फोटोग्राफी , व्हिडीओ शुटींग , सिक्युरिटी गार्ड , फैशन डिझाईनिंग , टर्नर फिटर , रेफ्रिजरेशन प्लंबर , ऑटोमोबाईल, रीपेयरिंग (३ व्हीलर / ४ व्हीलर), स्प्रे पेंटिंग इत्यादी विद्यावेतन खालील प्रमाणे (प्रतीप्रशिक्षणार्थी प्रतिमाह)
-
. स्थानिक प्रशिक्षणार्थ्यास रु . १५०/-
-
. महानगरपालिका क्षेत्रात रु . २५०/-
-
. बाहेरगावी प्रशिक्षण असल्यास रु . ३००/-
-
. प्रशिक्षण फ्री प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना महामंडळामार्फत देण्यात येते .
बीज भांडवल योजना
-
महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलामधुन बीज भांडवल योजना राबविण्यात येते .योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे .
-
. प्रकल्प मर्यादा रु . ५०,००० /- ते रु . ५ लाखापर्यंत .
-
. प्रकल्प मर्यादेच्या २०% बीज भांडवल कर्ज महामंडलामार्फत ४% द.सा.द .शे. व्याजदराने देण्यात येते .
-
सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदान रु . १०,००० /- चा समावेश आहे .
-
. बँकेचे कर्ज ७५% देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियामाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो .
-
. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षाचे आत करावी लागते .
-
. अर्जदारास ५ % स्वत : चा सहभाग भरावयाचा आहे .
-
-
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.)
मुदती कर्ज योजना
-
प्रकल्प मर्यादा रु . ५ लाख
-
एनएसएफडीसी यांच्या मुदती कर्जामध्ये महामंडळाकडून २०% बीज भांडवल ४% व्याज दराने दिले जाते त्यामध्ये रु . १०,००० /- पर्यंत अनुदाणाचाही समावेश आहे .
-
अर्जदाराचा सहभाग ५% आसतो .
-
एनएसएफडीसीच्या कर्जावर ६% व्याजदर आकारण्यात येतो .
-
कर्जाची परतफेड ५ वर्षात समान हप्त्यात करावयाची आहे .
-
महामंडळा मार्फत दिले जाणारे बीज भांडवलावर ४% व्याज आकारण्यात येते .
-
एकूण तरतुदीच्या १०% रक्कम रु . ५ लाखा पुढील व रु . ३० लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी उपयोग केला जातो व त्यावर ८% व्याज आकारले जाते .
-
सिड भांडवल योजना
-
अर्जदारास बँकेमार्फत रु . ५० लाखापर्यंत कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रकल्प किमतीच्या २०% किंवा जास्तीत जास्त रु . १० लाख सिड कपीटल एनएसएफडीसी मार्फत वितरीत करण्यात येते . बँके मार्फत मंजूर प्रकरणात मंजुरी एनएसएफडीसीकडे पुरस्कृत करण्यात येतात व त्याच्या कडून मंजुरी व निधी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येते .
-
सुक्ष्मपतपुरवठा
-
या योजनेंतर्गत रु. ३०,००० /- पर्यंत कर्ज देण्यात येत असून प्रकल्पाच्या ५०% मात्र जास्तीत जास्त रु. १०,०००/- पर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो . कर्जावर ५% व्याज आकरण्यात येत असून कर्जाची परतफेड ३ वर्षात समान हप्त्यात करावयाची आहे .
-
महिला समृद्धी योजना
-
महिलांना या योजनेंतर्गत रु. ३०,०००/- कर्ज देण्यात येत असून प्रकल्पाच्या ५०% मात्र जास्तीत जास्त रु . १०,०००/- अनुदान देण्यात येते . व्याजदर ४% आकारण्यात येत असून कर्जाची परतफेड ३ वर्षात करावयाची आहे .
-
महिला किसान योजना
-
या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना रु. ५०,००० /- पर्यंत कर्जाचा लाभ देण्यात येतो . दारिद्र रेषेखालील महिलांना कर्जाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त रु. १००००/- अनुदान देण्यात येते . या योजनेंतर्गत एन.एफ.डी.सी. कडून कर्जाच्या ९०% अर्थसहाय्य देण्यात येते व त्या रक्कमेवर ५% व्याज आकारण्यात येते . कर्जाची परतफेड १० वर्षात करावयाची आहे. या योजनेंतर्गत फळे , भाजीपाला , फुले उत्पादन करणे , बाग बागीचा , धान्य , कडधान्य , तेलबिया इ . शेतीपासून उत्पादन करणारे व्यवसायांना कर्ज दिले जाते . हि योजना दि . ०१-०५-२००८ पासून सुरु करण्यात आलेली आहे .
-
उच्च शैक्षणिक कर्ज योजना
-
एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशात तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजनेंतर्गत देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्याकरिता रु . ७. ५० लाखापर्यंत कर्ज देण्याचे प्रावधान आहे , तसेच देशाबाहेर रु. १५. ०० लाखापर्यंत कर्ज देण्याचे प्रावधान आहे . व्याजदर द.सा.द.शे. ४% व्याजदर आकारव्याचा आहे . तसेच स्त्री लाभ धारकांनकरिता द.सा.द.शे.४% व्याजदर आकारवयाचा आहे
-
-
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना - (एन.एस.के.एफ.डी.सी)
-
केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर , अस्वच्छ काम करणाऱ्या सफाई कामगारांचे व त्यांचेवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे . त्यांत विविध व्यवसाय करणेसाठी रु. १०. ०० लाख कमाल मर्यादेपर्यंत कर्ज देण्यात येते .
