

प्रबोधक - एका विचाराची सुरुवात
अतुल कुलकर्णीच्या तोंडी एक छान वाक्य आहे, सिस्टीम को बदलना है तो सिस्टीम मी उतरना पडेगा।. तसाच संवाद माधवन च्या तोंडी रंग दे बसंती मध्ये आहे. "कोई देश परफेक्ट नाही होता, उसे परफेक्ट बनाना पडता है| स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय, आमच्या देशातील तरुणांमधून मला ऋषी घडवायचे आहेत. ऋषी कशासाठी? या देशातील विपन्नावस्था, दारिद्र्य, दैन्य दूर करण्यासाठी.विवेकानंदांनी आम्हा तरुणांना जागृत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी आम्हाला आमचा सुंदर इतिहास सांगितला. आमच्या राष्ट्राचा प्रदीप




















