

चंदन लागवड” कार्यशाळा उत्साहात संपन्न;कोकणातील शेतीला नवे दिशादर्शन
दापोली : प्रबोधक संस्था आणि वनशास्त्र महाविद्यालय, दापोली कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “चंदन लागवड” या विषयावरील कार्यशाळा नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेत कोकणातील शेतीसाठी पर्यायी व उच्च मूल्य असलेल्या पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी चंदन लागवडीची तांत्रिक माहिती, लागवडीचे नियोजन, बाजारपेठेतील संधी आणि व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. लातूर येथील महाराष्ट्र चंदन कृषी उत्प




















